Polity

 

Results

#1. भारतीय संसदेसंबंधी खाली दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ? अ) राज्यघटनेने संसदेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची तरतूद केली आहे. ब) संसदेला राज्य सूचीत समाविष्ट असलेल्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार लोकसभा देऊ शकते. क) लोकसभेचा सामान्य कार्यकाळ (5 वर्षे) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याद्वारे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविला जाऊ शकतो. [MPSC Excise PSI Mains 2017]

#2. कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते ? अ) अनुच्छेद 356 ब) अनुच्छेद 352 क) अनुच्छेद 360 ड) अनुच्छेद 365 [MPSC ASO Mains 2017]

#3. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? [MPSC Rajyaseva Mains 2019]

#4. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? [MPSC Forest Services Mains 2016]

#5. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो ? [MPSC STI Prelims 2012]

#6. खालील विधाने विचारात घ्या : अ) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात. ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता दोन महिन्यांच्या आत घ्यावीच लागते. क) राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी साध्या बहुमताने मान्यता दिली पाहिजे. ड) राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कोणत्याही वेळी मागे घेऊ शकतात त्यासाठी मान्यतेची गरज नसते. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? [MPSC Forest Services Mains 2019]

#7. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत ‘सशस्त्र बंड’ हा शब्द कधी जोडला गेला ? [MPSC Rajyaseva Prelims 2021]

#8. 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती तरतूद केलेली नाही ? [MPSC Rajyaseva Prelims 2019]

#9. भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? [MPSC Rajyaseva Mains 2018]

#10. अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानांपैकी योग्य विधान कोणते ते सांगा : अ) अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात ते बरखास्त होत नाहीत. ब) अनुच्छेद क्रमांक 352 च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदेनिर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटकराज्यामध्ये एक समयावच्छेदी अधिकार प्राप्त होतात. क) अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत घटकराज्याची कायदेमंडळे कार्यरत राहू शकतात. [MPSC Rajyaseva Mains 2019]

#11. भारतीय संविधानाच्या कलम 356 च्या विषयी अनेक वादविवाद उत्पन्न झाले आहेत. खालीलपैकी कोणत्या विषयाशी या कलमाचा संबंध असल्याने ते विवादास्पद ठरते ? [MPSC Rajyaseva Mains 2013]

#12. राष्ट्रपतीने ‘आर्थिक आणीबाणी’ घोषित केल्यास त्याचे खालीलपैकी कोणते परिणाम होतील ? अ) राष्ट्रपती नागरिकांचे सर्व मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात. ब) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायाधीश वगळून सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यात कपात करू शकतात. क) राष्ट्रपती आर्थिक व्यवहारातील सुज्ञपणाच्या तत्त्वाचे पालन करण्यासंबंधी राज्याला आदेश देऊ शकतात. ड) राज्य विधिमंडळाने संमत केलेली सर्व अर्थ विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवली जाऊ शकतात. [MPSC ASO Mains 2018]

#13. राष्ट्रीय आणीबाणी (अनुच्छेद-352) आणि राष्ट्रपती राजवट (अनुच्छेद-356) यांसंदर्भातील चुकीची तरतूद ओळखा : [MPSC Excise PSI Mains 2017]

#14. खालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलमे विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. ब) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 356 राज्य आणीबाणीशी (राष्ट्रपती राजवट) संबंधित आहे. क) भारतीय राज्यघटनेतील कलम क्र. 360 राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ? [MPSC Combine Group B Prelims 2017]

#15. राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ? अ) बाह्य (परकीय) आक्रमण ब) अंतर्गत कलह क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश ड) आर्थिक कलह [MPSC PSI Prelims 2013]

#16. योग्य कथन/ने ओळखा : अ. राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ एकावेळेस एक वर्ष वाढविण्याचा अधिकार आहे. ब. आणीबाणी संपल्याची घोषणा झाल्यानंतर लोकसभेचा कार्यकाळ सहा महिन्यांपेक्षा जास्त वाढविता येत नाही. [MPSC Forest Services Mains Oct 2022]

#17. राज्यघटनेनुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट घोषित केली जाऊ शकते : अ) जेव्हा राज्यशासनाद्वारे मांडलेले विधेयक राज्य विधिमंडळात नामंजूर होते. ब) जर राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे राज्यशासन काम करीत नसेल. क) जर केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास राज्य शासन असमर्थ असेल. ड) जेव्हा राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर मतभिन्नता असेल. [MPSC Rajyaseva Mains 2018]

#18. अनुच्छेद 352 हे अनुच्छेद 356 पेक्षा कसे वेगळे आहे? खालील विधाने विचारात घ्या : अ) राष्ट्रीय आणीबाणीस संसदीय मान्यता एक महिन्यात मिळणे आवश्यक आहे तर राष्ट्रपती राजवटीच्या बाबतीत दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. ब) अनुच्छेद 352 खालील आणीबाणीस मान्यतेसाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते तर राष्ट्रपती राजवटीस केवळ साध्या बहुमताची गरज असते. क) राष्ट्रीय आणीबाणी ही दर सहा महिन्यांसाठी संसदीय मान्यतेच्या अटीवर कितीही काळ चालू राहू शकते तर राष्ट्रपती राजवटीचा कमाल कालावधी हा एक वर्षाचा असतो. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? [MPSC Industrial Inspector Mains Sept 2022]

#19. अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणेबाबत विधाने विचारात घ्या : अ) तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर ती आपोआपच संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. ब) राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर. [MPSC Rajyaseva Prelims 2017]

#20. भारतीय संविधानाचे कलम 356 कशा संदर्भात आहे ? अ) राज्यपालाची नियुक्ती ब) घटक राज्याची विधानसभा बरखास्तीबाबत क) संघराज्याचे स्वरूप एककेंद्री होणेबाबत ड) नवीन राज्य निर्मितीबाबत [MPSC ASO Mains 2012]

#21. खालील विधाने विचारात घ्या : अ) राष्ट्रपतीने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यास विधानसभेचा कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो. ब) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात विधानसभेचा कार्यकाळ एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो. क) विधानसभेचा विस्तारित (वाढविलेला) कार्यकाळ, हा आणीबाणी उठल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त असणार नाही. वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? [MPSC Rajyaseva Mains May 2022]

#22. केव्हा केव्हा राष्ट्रीय आणीबाणी नव्याने घोषित केली गेली ? अ) भारत चीन युद्ध आरंभ 1962 ब) भारत पाकिस्तान युद्ध आरंभ 1965 क) भारत बांग्लादेश संघर्ष 1971 ड) अंतर्गत सुरक्षेच्या निमित्ताने 1975 [MPSC Forest Services Mains 2014]

#23. खालीलपैकी कोणते विधान/ने चुकीची आहे/त ? अ) अनुच्छेद-365 देखील राष्ट्रपतीस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार प्रदान करते. ब) राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत त्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता देणे अत्यावश्यक असते. क) जर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली तर पुढील एक वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू राहते. ड) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालय रद्द करू शकतो. [MPSC ASO Mains 2019]

#24. राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित केल्याचे खालीलपैकी कोणते आवश्यक परिणाम होतातच असे नाही ? अ) राज्य विधानसभेचे विसर्जन ब) राज्य विधानपरिषदेचे विसर्जन क) राज्यातील मंत्रिपरिषदेची पदच्युती [MPSC PSI Mains 2019]

#25. युद्ध, परकीय आक्रमण किंवा लष्करी उठाव यामुळे निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी घटनेने केंद्र शासनाला कोणते विशेष अधिकार दिले आहेत ? योग्य पर्याय निवडा : अ) केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये महसूल वाटपाच्या संदर्भात असलेल्या तरतुदींमध्ये केंद्र बदल करू शकते. ब) राज्यांना त्यांचे कार्यकारी अधिकार वापरण्यासंदर्भात केंद्र शासन आदेश देऊ शकते. क) राज्य सूचीमध्ये अंतर्भूत कोणत्याही विषयावर संसद कायदे करू शकते. ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचे आदेश केंद्र देऊ शकते. [MPSC Rajyaseva Prelims 2013]

#26. राष्ट्रपतींना जर वाटले की, युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र उठावामुळे भारताच्या किंवा भारताच्या काही प्रदेशाच्या सुरक्षिततेला भयंकर धोका निर्माण झाला आहे तर ते राज्यघटनेच्या अनुच्छेद क्रमांक ______ अन्वये संपूर्ण भारतात किंवा भारताच्या काही भागात आणीबाणी जाहीर करू शकतात. [MPSC STI Mains Oct 2023]

#27. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 356 अनुसार घटक राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडण्याच्या कारणास्तव राज्यातील राष्ट्रपती राजवट खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत/कारणास्तव एक वर्षापेक्षा जास्त काळ चालू ठेवता येऊ शकते ? अ) संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर. ब) केंद्रीय कॅबिनेटने राष्ट्रपती राजवट चालू ठेवणे आवश्यक आहे असे राष्ट्रपतीस लेखी कळविले तर. क) संबंधित राज्यात काही अडचणींमुळे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे अवघड आहे असे निर्वाचन आयोगाने प्रमाणित केले तर. ड) केवळ राष्ट्रीय आणीबाणी चालू असेल तर. [MPSC PSI Mains July 2022]

#28. खालील जोड्या योग्यपणे जुळवा : कलमे : अ) कलम-352 ब) कलम-356 क) कलम-371 ड) कलम-360 तरतुदी : 1) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवट 2) आर्थिक आणीबाणी 3) राष्ट्रीय आणीबाणी 4) महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या संदर्भात विशेष तरतूद [MPSC ASO Mains 2016]

Previous
Finish

Scroll to Top